जालना: नियोजनाअभावी वाहतूक कोंडी; मोतीबाग प्रवेशद्वार ते विसर्जन स्थळापर्यंत वाहतुकीचा गुंता;गणेशमूर्तींसह भक्तांची मोठी गैरसोय
Jalna, Jalna | Sep 26, 2026 गणेशोत्सवाच्या सांगता सोहळ्यानिमित्त गणेशमूर्ती विसर्जनासाठी शहरातून मोठ्या संख्येने गणेश मंडळे, गणेशभक्त आणि नागरिक विसर्जन स्थळाकडे रवाना झाले. मात्र, विसर्जन मार्गावरील वाहतुकीच्या नियोजनात काही ठिकाणी उणीव राहिल्याने मोतीबाग प्रवेशद्वारापासून विसर्जन स्थळापर्यंत अनेक ठिकाणी वाहतुकीचा गुंता निर्माण झाला. त्यामुळे गणेशमूर्ती घेऊन जाणार्या वाहनांसह गणेशभक्त आणि बालगोपालांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले.