निवडणूक अधिकारी तथा अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी आज 5 जानेवारी सोमवार रोजी दुपारी साडे तीन वाजता अमरावती येथील सांस्कृतिक भवन परिसरात असलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र (EVM) गोदामाची सविस्तर पाहणी केली. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ई.व्ही.एम. यंत्रांच्या साठवणूक, सुरक्षा व व्यवस्थापनाबाबत सुरू असलेल्या कामकाजाचा आढावा घेण्याच्या उद्देशाने ही पाहणी करण्यात आली.यावेळी आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी ई.व्ही.एम. साठवणूक व व्यवस्थापन केंद्रातील प्रत्यक्ष...