द्राक्षबागेची बिकट अवस्था पाहून उगाव येथील प्रगतिशील शेतकऱ्याची आत्महत्या निफाड (विशेष प्रतिनिधी )निफाड तालुक्यातील उगाव येथील प्रगतिशील शेतकरी श्री. कैलाश यादवराव पानगव्हाणे (वय अंदाजे ४५ वर्षे) यांनी आज सकाळी आपल्या द्राक्षबागेत विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे उगाव व परिसरात शोककळा पसरली असून, एक प्रगतिशील शेतकरी गमावल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.