तुमसर: आमदार कारेमोरे यांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालय तुमसर येथे पालकमंत्री जनता दरबार संपन्न
तुमसर-मोहाडी विधानसभा क्षेत्राचे आमदार राजू कारेमोरे यांच्या अध्यक्षतेखाली आज, २९ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी १:३० वाजता दरम्यान तहसील कार्यालय, तुमसर येथे पालकमंत्री जनता दरबार आयोजित करण्यात आला होता. आमदार कारेमोरे यांनी यावेळी उपस्थिती दर्शवत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. या जनता दरबारामध्ये तहसील कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या विविध विभागांशी संबंधित जनतेने आणलेल्या समस्या ऐकून घेण्यात आल्या. नागरिकांनी मांडलेल्या सर्व समस्यांची पूर्णपणे अंमलबजावणी करण्यात येईल....