समुद्रपूर: गिरड येथे शिव परमात्मा यांचा ८९ वा शिव अवतरण दिवस साजरा, प्रजापिता ब्रम्हकुमारी ईश्वरी विश्वविद्यालयाचे आयोजन
गिरड येथिल प्रजापिता ब्रम्हकुमारी ईश्वरी विश्व विद्यालयाच्या वतीने गिरड येथिल उपासक कवडूभाभाई पाटील यांच्या निवासस्थानी शिव परमात्मा यांच्या ८९ व्या शिव अवतरण दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रमादीदी व, किरण दिदी यांच्या हस्ते ध्वजारोहण करून केक कापून उपस्थिती मान्यवरांच्या हस्ते मेमेबत्ती पेटवून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाला दिवाकर गाठे,मोहन गिरडे, अरुण मोटघरे,, कवडुजी चामचोर, आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.