समुद्रपूर: एकलव्य परीक्षेत घवघवीत यश संपादन करणाऱ्या आस्था चवरे हिचा मोहगांव ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार
समुद्रपुर:नुकताच एकलव्य परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यात तावी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेची विद्यार्थिनी आस्था सत्यपाल चवरे हिने घवघवीत यश संपादित केले आहे.आपल्या गावाचे नाव व कुटुंबांचे नाव उंचविले आहे.या तिच्या यशाच कौतुक करणाऱ्यांठी मोहगांव ग्रामपंचायीत तिच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सरपंच विलास नवघरे तर प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामसेवक संतोष पुरकाम, संदिप दातारकर, जगदीश महातळे,अनिल धोटे, हरीभाऊ डडमल आदी उपस्थित होते.