समुद्रपूर: गिरड येथिल पुरातन सुप्रसिद्ध श्रीराम मंदिरात आजपासून श्रीराम जन्मोत्सवाला प्रारंभ:विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन
गिरड: येथिल सुप्रसिद्ध पुरातन श्रीराम मंदिरात आज रामनवमीनिमित्त श्रीराम जन्मोत्सव साजरा होणार आहे. आज ध्वजारोहण व गुढी उभारून श्रीराम नवरात्रात सकाळी ८ वाजता श्रीराम पंचायतन अभिषेक करून महोत्सवाला प्रारंभ करण्या आला. सोमवार पासून रोज सकाळी ७ ते ८ सामूहिक रामरक्षा पठन होईल. सायंकाळी ७ वाजता भक्तिगीतांचा कार्यक्रम होईल.६ एप्रिलला सकाळी १० वाजता हभप श्रीराम रोडे महाराज मालेगाव जिल्हा वासिम यांचे किर्तन आणि दुपारी १२ वाजता रामलीलाचा जन्म उत्सव सायंकाळी ६ वाजता घोडा यात्रा निघेल.