समुद्रपूर: ट्रकची दुचाकीला मागून धडक: दुचाकीस्वार दोघे जखमी: जाम समुद्रपुर रोडवरील प्लास्टिक कंपनी जवळील घटना
जाम समुद्रपुर मार्गावरील प्लास्टिक कंपनी जवळ भरधाव वेगाने येत असलेल्या ट्रकने दुचाकीला मागून जबर धडक दिली या अपघातात दुचाकीस्वार पुरुष व महिला जखमी झाले.त्यांना उपचारासाठी सेवाग्राम रुग्णालयात हलवण्यात आले आहे. प्राप्त माहितीनुसार दुचाकीस्वार नामदेव बापुराव कापसे हे आपल्या दुचाकी क्रमांक एम एच ३२ ए.टी ३१४२ ने नंदा तुकाराम कुमरे समुद्रपुर यांना माघे बसवून जाम कडून समुद्रपुरकडे येत असतांना मागून येणाऱ्या ट्रक क्रमांक एच एच १८ बि.जी ८८०९ दुचाकीला जबर धडक दिली या दोघे जखमी झाले.