नागपूर शहर: सक्करदरा परिसरात तीन अनोळखी व्यक्तींचे आढळले मृतदेह
27 मे ला रात्री 8 वाजून 30 मिनिटांनी मिळालेल्या माहितीनुसार सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत वेगवेगळ्या ठिकाणी तीन अनोळखी पुरुष बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. त्यांना उपचारासाठी मेडिकल हॉस्पिटलमध्ये नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.सक्करदरा चौक उड्डाणपुलाखाली अंदाजे ५० वर्षे वयाचा पुरुष बेशुद्ध आढळला.मोठ्या ताजबाग लंगरखान्याच्या भिंतीजवळ अंदाजे ५५ वर्षे वयाचा पुरुष बेशुद्ध आढळला. मोठ्या ताजबाग शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या पाठीमागील गल्लीत अंदाजे ६० वर्षे वयाचा पुरुष बेशुद्ध आढळला.