जालना: गणेश विसर्जन पूर्वतयारीचा आढावा: मोतीबाग विसर्जन कुंड येथे प्रशासकीय अधिकार्यांची संयुक्त पाहणी!
Jalna, Jalna | Sep 24, 2026 25 सप्टेंबर रोजी होणार्या श्री गणेश विसर्जन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर जालना शहरातील मोतीबाग येथील विसर्जन कुंडाची आज प्रशासकीय अधिकार्यांनी संयुक्त पाहणी केली. विसर्जन सोहळा शांततेत, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक पद्धतीने पार पडावा, यासाठी विविध विभागांकडून करण्यात आलेल्या तयारीचा यावेळी आढावा घेण्यात आला. गुरुवार दि. 24 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या पाहणीदरम्यान जालना शहराच्या आयुक्त अंजली शर्मा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते.