नागपूर शहर: प्रताप नगर चौकात दोन कारची टक्कर; सुदैवाने जीवितहानी टळली
प्रताप नगर चौकात रविवारी सकाळी दोन कारमध्ये भीषण धडक झाल्याची घटना घडली. या अपघातामुळे परिसरातील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती.सुदैवाने, या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून दोन्ही कारचे चालक पूर्णपणे सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातानंतर लगेचच स्थानिक नागरिक आणि वाहनधारकांनी घटनास्थळी गर्दी केली होती.