नागपूर शहर: ओयो हॉटेल मालकाचा खून करून भरले बोरीत, त्या मृतदेहाची पटली ओळख : सत्यविर बंडीवार सहाय्यक पोलीस आयुक्त
जरीपटका विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सत्यविर बंडीवार यांनी 22 एप्रिल ला दुपारी 5 वाजताच्या सुमारास दिलेल्या माहितीनुसार, पोलीस ठाण्याच्या हद्दीत नाल्यामध्ये बोरीत एका व्यक्तीचा मृतदेह आढळला होता. या मृतदेहाची ओळख पटली असून हा मृतदेह सदर परिसरात असलेल्या हॅप्पी स्प्रिंग या ओयो हॉटेलचे मालक राहुल साहू यांचा असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान धक्कादायक म्हणजे ते सदर परिसरातून बेपत्ता असल्याचीही तक्रार दाखल आहे. जुन्या वादाच्या कारणावरून हा खून केला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.