वर्धा: महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे : शीतल पंकज भोयर
Wardha, Wardha | Jan 26, 2026 महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासोबतच सामाजिक सहभाग वाढवावा, तसेच अशा पूर्तीसारख्या व्यासपीठांचा उपयोग आत्मविश्वास वृद्धिंगत करण्यासाठी करावा, असे आवाहन प्रियदर्शिनी महिला विकास संस्थेच्या अध्यक्षा शीतल पंकज भोयर यांनी केले. मकर संक्रांतीच्या पावन पर्वानिमित्त पूर्ती सुपर बझार, युरिच मॉल, वर्धा येथे पारंपरिक हळदी-कुंकू समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. या समारंभात शहरातील व परिसरातील सुमारे 300 महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आनंदोत्सव साजरा केला. महिलांना हळदी-कुंकू तसेच वाणाचे व