वर्धा: प्रजासत्ताकदिनी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण
Wardha, Wardha | Jan 26, 2026 भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलिस कवायत मैदानावर आयोजित मुख्य सोहळ्यात पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते दिनांक 26 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजताच्या सुमारास विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा गौरव करण्यात आला. सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनातील उत्कृष्ट कार्याबद्दल जिल्हाधिकारी वान्मथी सी व जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी श्रीपती मोरे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच विरपत्नी आणि विरमातांचा सन्मान करण्यात आला. पोलिस महासंचालकांकडून सन्मानित अधिकाऱ्यांना सन्मानचिन्ह प्रदान