वर्धा: प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलिस मुख्यालयात पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण
Wardha, Wardha | Jan 26, 2026 प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलिस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी जिल्ह्यातील जनतेला दिलेल्या शब्दांची पूर्तता करण्यास आपण कटीबद्ध असल्याचे स्पष्ट केले. शेतकऱ्यांसाठी सिंचन व वीज सवलत, युवकांसाठी कौशल्य प्रशिक्षण, महिलांसाठी लखपती दिदी व उमेद मॉल, तसेच आरोग्य क्षेत्रात क्रिटिकल केअर ब्लॉक, कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅन यांसारख्या विविध योजनांची माहिती त्यांनी दिली. सामुहिक प्रयत्नातून वर्धा जिल्हा राज्यातील विकास