वर्धा: जिल्ह्यातील खेळाडूंना अत्याधुनिक क्रीडा सुविधा उपलब्ध करुन देण्यावर भर - पालकमंत्री डॉ.पंकज भोयर
Wardha, Wardha | Jan 26, 2026 दिनांक 26 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजताच्या सुमारास जिल्हा क्रीडा संकुल येथे बॅडमिंटन हॉल व शुटींग रेंज अद्ययावत क्रीडा सुविधेचे पालकमंत्री डॉ.भोयर यांच्याहस्ते लोकार्पण झाले, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास नगराध्यक्ष सुधीर पांगुळ, जिल्हाधिकारी वान्मथी सी, मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, जिल्हा क्रीडा अधिकारी आशा मेश्राम आदी उपस्थित होते.