हवेली: अखेर ग्रामस्थांच्या आंदोलनाची दखल घेत महानगरपालिकेच्या वतीने नांदोशी येथील रस्त्याच्या कामाची सुरुवात करण्यात आली
Haveli, Pune | Nov 1, 2025 नांदोशी येथील ग्रामस्थ हे मूलभूत सुविधा व रस्त्याची झालेली दुर्दशा याप्रकरणी त्रस्त झाले होआह. यासाठी त्यांनी रस्त्यामधील खड्ड्यामध्ये साचलेल्या पाण्यात बसून पुणे महानगरपालिकेच्या विरोधात आंदोलन केले होते. अखेर याची दखल घेत महानगरपालिकेने सदर रस्त्याच्या कामाला सुरुवात केली आहे.