अलिबाग: खरिपाच्या पार्श्वभूमीवर खतांचा काळाबाजार रोखणार
Alibag, Raigad | Jun 9, 2026 शेतकऱ्यांची खतांसाठी होणारी वणवण थांबवून कृत्रिम टंचाई आणि काळाबाजार करणाऱ्या साठेबाजांना चाप लावण्यासाठी रायगड जिल्हा परिषद कटिबद्ध आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून खत वितरण व्यवस्थेत पारदर्शकता आणल्यास शेतकऱ्यांची फसवणूक थांबेल आणि थेट शेतकरीच या व्यवस्थेवर वॉच ठेवू शकतील, याच उद्देशातून आम्ही खास डिजिटल प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आहे," असा ठाम विश्वास रायगड जिल्हा परिषदेचे कृषी सभापती वैकुंठ पाटील यांनी व्यक्त केला.