नागपूर शहर: नागपुरात कुख्यात गुंडावर हद्दपारीची कारवाई
9 जून ला रात्री 7 वाजता मिळालेल्या माहितीनुसार शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुख्यात गुन्हेगार श्रीधर उर्फ राजा उर्फ राजू तुळशीराम कारेमोरे (वय ५०) याला पोलिसांनी हद्दपार केले आहे.आरोपीवर गंभीर गुन्हे दाखल असूनही त्याच्या वागणुकीत सुधारणा होत नव्हती.पोलीस उपायुक्त यांनी त्याला नागपूर शहर व ग्रामीण हद्दीतून ३ महिन्यांसाठी हद्दपार करण्याचे आदेश दिले.शांतीनगर पोलिसांनी कारवाई पूर्ण करून आरोपीला नातेवाईकांच्या स्वाधीन केले आहे.