अमरावती: अमोल मिटकरीची गडकरींवर बोलायची लायकी तरी आहे का ; भाजपचे प्रदेश प्रवक्ते . शिवराय कुलकर्णी
अमोल मिटकरी यांनी राष्ट्रसंतांच्या मौन श्रद्धांजली सोहळ्यात नितीनजी गडकरी प्रार्थने आधीच निघून गेल्याची टीका केली होती. ही टीका निराधार व वस्तुस्थितीला धरून नाही. गुरुदेव सेवा मंडळावरही अमोल मिटकरी यांनी आगपाखड केली होती. डोक्यावर भगवी टोपी चढवून बाजारू विचारवंताने आपले विचार दारिद्र्य दर्शवले आहे. अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी दिली आहे.