नागपूर शहर: न्यू इरा हॉस्पिटलच्या मेडिकल स्टोअरवर एफडीएची कारवाई
नागपूरच्या लकडगंज येथील 'न्यू इरा हॉस्पिटल'वर अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली आहे. रुग्णांना हॉस्पिटलच्याच दुकानातून औषधे घेण्यासाठी सक्ती करणे आणि बेसमेंटमध्ये विनापरवाना औषधांचा साठा करणे, या आरोपांमुळे ही कारवाई करण्यात आली. हॉस्पिटल प्रशासनाने मात्र हे आरोप फेटाळून लावत, ही केवळ एक गैरसमजूत असल्याचे म्हटले आहे.