सातारा: महाबळेश्वर व पाचगणी या पर्यटनस्थळांनाही मिळाला जागतिक वारसा; युनेस्कोच्या यादीमध्ये झाली नोंद : जिल्हाधिकारी संतोष पाटील
Satara, Satara | Sep 17, 2025 महाराष्ट्राची शान आणि पर्यटकांचे आवडते ठिकाण असलेल्या महाबळेश्वर आणि पाचगणीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. युनेस्कोने या दोन्ही निसर्गरम्य स्थळांना 'नैसर्गिक वारसा स्थळांच्या' तात्पुरत्या यादीत स्थान दिले आहे. या निर्णयामुळे ही स्थळे आता जागतिक नकाशावर चमकणार असून, त्यांच्या संवर्धनासाठी आणि विकासासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर नवी दारे उघडली आहेत. सातारचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी बुधवारी दुपारी दोन वाजता पत्रकारांना याबाबत माहिती दिली.