राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये दिसून आलेल्या 'विसंगती' आणि ऐनवेळी घेतलेल्या निर्णयांविरोधात काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी आज, १० डिसेंबर रोजी दुपारी 12.20 वाजता हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी मागणी केली. भारतीय राज्यघटनेच्या कलम २४३(क) अंतर्गत मिळालेल्या अधिकारांचा गैरवापर केल्याबद्दल राज्य निवडणूक आयुक्तांना (SEC) पदावरून दूर करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करावी, अशी मागणी त्यांनी विधानसभेत केली.