नागपूर शहर: शिवाजी नगरमध्ये खड्डा बनला धोका; मोठा अनर्थ टळला
नागपूरच्या शिवाजी नगर परिसरात रस्ता खचून झालेल्या अपघाताची एक धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मातीने भरलेला खड्डा रस्ता ओलांडणाऱ्या वाहनांसाठी मोठा धोका ठरला आहे.शिवाजी नगरमधील एका रस्त्यावरून मातीने भरलेला एक खड्डा होता. जेव्हा एक मालवाहू बोलेरो गाडी त्या ठिकाणाहून जात होती, तेव्हा अचानक त्यातील माती खचली आणि गाडीचा एक भाग खड्ड्यात अडकला.