यावल: सांगवी बुद्रुक ते हिंगोणा रस्त्यावर शंतनू पेट्रोल पंपा समोर आयसर ट्रकला लागली आग, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली
Yawal, Jalgaon | Sep 17, 2025 अंकलेश्वर बऱ्हाणपूर राज्य मार्गावर सांगवी बुद्रुक ते हिंगोणा या गावादरम्यान शंतनू पेट्रोल पंप आहे. या पेट्रोल पंपा जवळ आयशर ट्रक क्रमांक एम.एच.१४ सी.वाय.७९१७ घेऊन साहेबराव बडगुजर राहणार राणीचे बांबरुड तालुका पाचोरा हे जात होते. अचानक या वाहनाला आग लागली. नागरिकांनी धाव घेऊन आग विझवली व सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. मात्र ट्रक जळाला आहे व ट्रक चालकाचे नुकसान झाले आहे.