नागपूर शहर: जिद्दीला कशाचेच बंधन नाही! पाल्कची सामुद्रधुनी पोहून पार करणाऱ्या नागपूरच्या ईश्वरी पांडेचे शाही स्वागत
"दृष्टी नाही, पण ध्येय स्पष्ट आहे," हे नागपूरच्या ईश्वरी पांडे हिने जगाला दाखवून दिले आहे. पूर्णतः दृष्टीहीन असतानाही अथांग समुद्राच्या लाटांशी दोन हात करत ईश्वरीने श्रीलंका ते भारत हे अंतर यशस्वीरित्या पोहून पार केले. या ऐतिहासिक जागतिक विश्वविक्रमानंतर आज नागपुरात तिचे आगमन झाले असता, नागपूरकरांनी तिचे अभूतपूर्व आणि जंगी स्वागत केले.