तुमसर: बालकांच्या अधिकारांविषयी आर्ट्स कॉलेज सिहोरा येथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
जागतिक बालिका दिनाचे औचित्य साधून आज दि. 16 ऑक्टोंबर रोज गुरुवारला दुपारी 1वा. टू जस्टीस इंडियन वेल्फेअर सोसायटी भंडारा आणि दामिनी पथक यांच्या संयुक्त विद्यमाने सिहोरा येथील आर्टस् कॉलेज मध्ये विद्यार्थ्यांना बालकांच्या अधिकारांविषयी मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना डिजिटल आणि सायबर गुन्हे, बालविवाह, लैंगिक अत्याचार आणि बालकामगार यासारख्या महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर माहिती देण्यात आली.