समुद्रपूर: कृष्णपेठ धूळ याञेत उमगला भक्ताचा जनसागर :निसर्गरम्य वातावरणात हजारो भक्त हनुमंत चरणी झाले नतमस्तक
समुद्रपूर :वर्धा व चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवर उसेगाव (कोरा) येथे लालनाला प्रकल्पाच्या कुशीत निसर्गरम्य वातावरणात भरणारी धूळ यात्रा आजही नित्यनेमाने कायम आहे गेल्या८६ वर्षापासून हनुमान मंदिर परिसरात भरणारी यात्रा आज मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या सोमवारी हजारो भाविकांची हनुमंतरायाच्या दर्शनासाठी रीघ लागली होती.यावेळी या यात्रेत भाविकाकडून कणकीचे पानगे आणि गोड प्रसादाची मेजवानी श्रद्धेने हनुमंताला नैवद्य म्हणून दिले.तर विदर्भातील विविध जिल्ह्यातून हजारो भाविकांची कुटुंब आले होते.