समुद्रपूर: इनरव्हील क्लबच्या वतीने शहरातील प्रभाग क्रमांक ४ मध्ये करण्यात आली वृक्षलागवड: महिलांनी घेतला वृक्षसंवर्धनाचा संकल्प
समुद्रपुर शहरातील सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असलेल्या इनरव्हील क्लबच्या वतीने दिवसेंदिवस वाढत प्रदुषणावर आळा घालण्यासाठी वृक्ष लागवड मोहीम हाती घेतली असून आज ३० जुलै रोजी १२ वाजता शहरातील प्रभाग क्रमांक ४ मध्ये वृक्षलागवड करण्यात आली यावेळी इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा समिक्षा मांडवकर,सचिव रस्मी दोंदल,रेखा कटारिया,माजी नगराध्यक्षा सिलाताई सोनारे,संगिता ढाकरे,संध्याताई ईसनकर ,नगरसेविका मायाताई जीवतोडे,प्रिया बाभूळकर, पूनम बादले,सुंनदा बुरडकर,साधना ठवरी ,नमिता पाठक आदि उपस्थित होत्या