नागपूर शहर: जरीपटक्यात दोन सराईत घरफोड्यांना अटक; ५ लाखांचा मुद्देमाल जप्त : प्रमोद चौधरी, पोलीस निरीक्षक
जरीपटका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद चौधरी यांनी 16 मे ला दुपारी 3 वाजता दिलेल्या माहितीनुसार,जरीपटका पोलिसांनी दोन वेगवेगळ्या बंद घरांमध्ये चोरी करणाऱ्या अभिषेक ऊर्फ दद्या आणि विशाल ऊर्फ चिमंडी या दोन सराईत चोरट्यांना अटक केली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, जेव्हा एखादे कुटुंब लग्नकार्य किंवा इतर कामासाठी घराबाहेर गेलेले असायचे, तेव्हा हे आरोपी बंद घरांना लक्ष्य करून चोरी करायचे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी ही