महागाव: महागाव तालुक्यातील कासोळा येथे ट्रक व ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात, १२ जण जखमी
काळी दौलत वरुन मुंबईसाठी नुकतीच नव्याने सुरू झालेल्या ट्रॅव्हल्सचा कासोळा येथे भिषण अपघात झाला. ट्रॅव्हल्स व ट्रकच्या समोरासमोर झालेल्या भिषण अपघातात दोन्ही वाहनांचे चालकासह १० प्रवासी गंभीर जखमी झाल्याची घटना आज दि ८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास घडली. प्राथमिक माहितीनुसार काळी दौलत वरुन निघालेल्या ट्रॅव्हल्स व ट्रकचा कासोळा येथे वळणावर भिषण अपघात झाला, धडकेचा आवाज इतका मोठा होता की आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.