नागपूर शहर: घरात लग्नाची लगबग, पण नियतीचा क्रूर घाला; वाहनाच्या धडकेत महिलेचा दुर्दैवी अंत, आरोपी अटक : बाबुराव राऊत वरिष्ठ पोलीस
पाचपावली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबुराव राऊत यांनी 1 मे ला सायंकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी दिलेल्या माहितीनुसार, घरात लग्नाची लगबग सुरू असतानाच बोलेरो च्या धडकेत एका महिलेचा दुर्दैवी अंत झाला. यामध्ये त्या महिलेचा पती देखील गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू केला आहे. याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबुराव राऊत यांनी दिली आहे.