मोर्शी: उपजिल्हा रुग्णालय मोर्शी येथे डॉक्टर प्रमोद पोतदार यांचे उपस्थितीत, जागतिक हृदय दिन साजरा
आज दिनांक 29 सप्टेंबरला दुपारी बारा वाजता उपजिल्हा रुग्णालय मोर्शी येथे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रमोद पोतदार यांचे उपस्थितीत जागतिक हृदय दिन साजरा करण्यात आला. डॉक्टर सचिन कोरडे यांनी यावेळी जागतिक हृदय दिनाबाबत व्यापक प्रमाणात माहिती देऊन, वाढत्या वयात होणारे आजार व त्या आजाराची घेण्यात येणारी काळजी याबाबतीत व्यापक प्रमाणात माहिती देण्यात आली. या कार्यक्रमाला उपजिल्हा रुग्णालयातील सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते