नागपूर शहर: गर्लफ्रेंड वर पैसे खर्च करण्यासाठी आजीच्याच घरात नातवाची चोरी; पोलिसांकडून गुन्हा उघड : अतुल तवाडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक
गणेश पेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल तवाडे यांनी 6 जूनला दुपारी 5 क वाजता दिलेल्या माहितीनुसार,गणेशपेठ परिसरात आपल्याच आजीच्या घरात चोरी करणाऱ्या तुषार प्रदीप मस्ते या नातवाला पोलिसांनी अटक केली आहे. गर्लफ्रेंडवर खर्च करण्यासाठी आणि 'बुलेट' दुचाकी खरेदी करण्यासाठी त्याने हा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून १ लाख ९३ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले असून, पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल तवाड