लातूर शहर महानगरपालिकेमार्फत मनपा मालकीच्या व बीओटी तत्त्वावरील व्यापारी संकुलातील गाळ्यांच्या भाडे वसुलीसाठी दि. ८ डिसेंबर २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत १०० टक्के व्याजसुट जाहीर करण्यात आली होती. ही सवलत आयुक्त श्रीमती मानसी यांच्या आदेशान्वये देण्यात आली असून उपायुक्त डॉ. पंजाब खानसोळे यांच्या मार्गदर्शनाखाली योजना राबविण्यात येत आहे.