नागपूर शहर: स्टार सिटी बसच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू; कपिलनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
शहरातील ऑटोमोटिव्ह चौक परिसरात एका भरधाव स्टार सिटी बसने दिलेल्या धडकेत एका ३८ वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. याप्रकरणी कपिलनगर पोलिसांनी बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे. योगेश गजानन कावळे हे ऑटोमोटिव्ह चौक, कामठी रोड येथून पायी जात होते. यावेळी टेकानाका चौकाकडून कामठी रोडकडे जाणाऱ्या स्टार सिटी बसने त्यांना जोरदार धडक दिली.