तुमसर: मेहेगाव येथे सुरु असलेल्या वेश्या व्यवसायावर दहशतवाद विरोधी शाखेची कारवाई, दोन आरोपींना अटक तर एका महिलेची सुटका
तुमसर तालुक्यातील मेहेगाव येथे सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर भंडारा दहशतवाद विरोधी शाखेने कारवाई केल्याची घटना दि. 18 सप्टेंबर रोज गुरुवारला सकाळी 9 वाच्या सुमारास उघडकीस आली. भंडारा दहशतवाद विरोधी शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे त्यांनी एका बनावट ग्राहकाला पाठवून माहितीची पडताळणी केली. यावेळी या व्यवसायात सापडलेल्या एका महिलेच्या सांगण्यावरून आरोपी वैभव बोरकर आणि भारत कोल्हटकर दोघे राहणार तुमसर यांना अटक करण्यात आली तर या व्यवसायात सापडलेल्या एका महिलेची सुटका करण्यात आली.