ठाणे: कोणी एकत्र येऊ द्या नाहीतर कुणाचा घटस्फोट होऊ द्या मात्र आगामी निवडणुकात आमचीच ताकद दिसणार: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
Thane, Thane | Sep 30, 2025 परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज टेंभी नाका येथील दुर्गेश्वरी देवीची मनोभावे आरती करून पूजा केली. यावेळी प्रतिक्रिया विचारली असता, येणाऱ्या निवडणुकांमध्ये आमची ताकद काय आहे ते दाखवून देऊ.मग कोणी एकत्र यायचं ते येऊ द्या, नाहीतर कुणाचा घटस्फोट होऊ द्या.महाराष्ट्रात आमची ताकद आहे, हे जनतेला माहित आहे.त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेना आणि महायुतीचा झेंडा फडकणार असे प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.