नागपूर शहर: वाढत्या तापमानामुळे शाळा सुरू करण्याची तारीख पुढे ढकलण्याचा विचार; गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांची माहिती
राज्यात दिवसेंदिवस तापमानाचा पारा वाढत चालला असून, या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शासन महत्त्वाचे पावले उचलण्याच्या तयारीत आहे. १५ जूननंतरही जर तापमानाची हीच गंभीर परिस्थिती कायम राहिली, तर परिस्थितीचा आढावा घेऊन शाळा सुरू करण्याची तारीख पुढे ढकलण्याचा विचार केला जाईल, अशी माहिती गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली.