लातूर: मांजरा धरणाचा विसर्ग कमी ,नदीपात्रात 18,745.37 क्युसेक्स (530.880 क्युमेक्स) इतका पाण्याचा विसर्ग सुरू
Latur, Latur | Sep 16, 2025 लातूर : मांजरा प्रकल्प धनेगाव धरणातील विसर्ग कमी करण्यात आला आहे. धरण पाणलोट क्षेत्रात पडणारा पाऊस व पाणीपातळी नियंत्रित करण्याच्या दृष्टीने आज दि. 16 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 8.00 वाजता गेट क्रमांक 1 ते 6 हे प्रत्येकी 0.25 मीटरने कमी करण्यात आले. सद्यस्थितीत मांजरा धरणाच्या सांडव्याची 6 वक्रद्वारे (गेट क्रमांक 1 ते 6) प्रत्येकी 1.00 मीटर ने सुरू असून, नदीपात्रात 18,745.37 क्युसेक्स (530.880 क्युमेक्स) इतका पाण्याचा विसर्ग सुरू आहे.