बार्शीटाकळी: अकोल्याच्या छावा संघटनेचा वाशिमच्या कारंजा नगराध्यक्ष निवडणुकीत मंगला मुंदे पाटील मजबूत; सर्व मराठा संघटनांचा पाठिंबा
अकोल्याच्या छावा संघटनेचा वाशिम जिल्ह्याच्या कारंजा लाड नगराध्यक्ष पदाच्या अपक्ष उमेदवार सौ. मंगला गजानन मुंदे पाटील यांना अखिल भारतीय छावा संघटना आणि सर्व मराठा संघटनांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. या पाठिंब्यामुळे त्यांचे पारडे निवडणुकीत भारी झाले आहे. कारंजा शहरात मराठा समाजाचे प्रमाण मोठे असून, सर्वच पक्षांनी यंदा इतर समाजांना उमेदवारी दिल्याने मराठा समाज एकवटला आहे. त्यामुळे मुख्य लढत ही एमआयएम उमेदवार आणि अपक्ष उमेदवार सौ. मंगला मुंदे या उभ्या आहेत.