नागपूर शहर: जुनी मंगळवारी येथील सिद्धेश्वर ट्रेंडिंग येथून बुलेट व रोख रक्कम लंपास
एकोणवीस एप्रिल ला दुपारी 05 वाजून 30 मिनिटांनी मिळालेल्या माहितीनुसार पोलीस ठाणे लकडगंज हद्दीतील जुनी मंगळवारी येथे राजू पौनीकर यांचे सिद्धेश्वर ट्रेंडिंग नावाचे धान्याचे दुकान आहे. आरोपीने धान्याच्या दुकानातून ड्रॉवर मध्ये ठेवलेले 50 हजार रुपये व दुकानासमोर ठेवलेली बुलेट लंपास केली. याप्रकरणी आरोपी विरुद्ध लकडगंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे.