सचिन मारोतराव वानखडे यांनी अज्ञात पोलिसात तक्रार दिली आहे. सचिन हा शेती करतो त्याच्याकडे पाच गायी आहे मार्डी शेत शिवारात गायीचारण्याकरता गेला असता, त्या ठिकाणावर डुक्कर मारण्यासाठी कुणीतरी अज्ञात इसमाने बॉम्ब टाकला होता. तो गाईने खाल्ल्यामुळे तिचा जबड्या तुटला. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. यामध्ये सचिनचे 40 हजार रुपयांचे नुकसान झाल्याची तक्रार त्यांनी कुऱ्हा पोलिसात दिली आहे. तेव्हा अज्ञात इस्मा विरोधात पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.