यावल नगरपरिषद निवडणुकी मध्ये वार्ड क्रमांक ८ ब या जागेवरील उमेदवार पंकज बारी यांनी शिवसेना शिंदे गट कडून उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र सूचक ची सही नसल्यामुळे त्यांचा अर्ज अपात्र ठरला होता. तेव्हा त्यांनी या अपात्रते विरुद्ध अपील दाखल केले होते. सदर अपील जिल्हा न्यायालयातून फेटविण्यात आल्यानंतर त्यांनी आयोग कडे पुन्हा अपील दाखल केले त्यामुळे अपील वर सुनावणी करीत अवधी मिळावा म्हणून या वार्डातील सदर जागेवरील निवडणूक स्थगित करण्यात आली आहे.