सुधागड: मासळी टंचाईने खवय्ये हवालदील; खोल समुद्रातील मासेमारी बंद
जून महिना अर्धा संपत आला तरी अध्यात पावसाने दमदार हजेरी लावली नाही. परिणामी नदी नाळे तळाव आणि धरणे आटली असून दुसरीकडे एक जूनपासून समुद्रातील मासेमारी ही कायदेशीर रित्या बंद झाली आहे खाऱ्या आणि गोड्या पाण्यातील अशा दोन्हीही प्रकारच्या माशांची तीव्र त्यांचाही निर्माण झाल्यामुळे बाजारात मासलीचे दर कडाडले आहेत. यंदा १५ जून उजळला तरी पाऊस न पडल्याने जलस्रोत आटले आहेत त्यामुळे दरवर्षी दिवसांत मुबलक मिळणारे मळे, शिवडा, कटला, अरल्या, वाम, कोळंबी, खवळ यासारखे गोड्या पाण्यातील मासे बाजारातून गायब झाले आहेत.