मंगरूळपीर: ‘माझी लाडकी बहीण’ योजनेतील केवायसी अटी शिथिल करण्याची मागणी
माजी जिल्हा परिषद अध्यक्षा ज्योतीताई गणेशपुरे यांनी 'माझी लाडकी बहीण' योजनेतील केवायसी संबंधित अडचणी दूर करण्यासाठी शासनाकडे निवेदन दिले आहे. केवायसी संधी द्यावी आणि अनुदान सुपूर्द करावे, तसेच घरात वाहन असलेल्या बेरोजगार युवतींना वंचित करू नये, असा आग्रह राखला आहे.