नागपूर शहर: नागपुरात बागेश्वर बाबांच्या निषेधार्थ जोरदार आंदोलन; शिवाजी महाराजांच्या अवमानाचा आरोप
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल कथित आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करत बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री (बागेश्वर बाबा) यांच्या विरोधात नागपुरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणाच्या निषेधार्थ विविध संघटनांनी एकत्र येत आंदोलन केले.नागपूरमधील छत्रपती चौक येथे संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ आणि जिजाऊ ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने एकत्र येऊन धीरेंद्र शास्त्री यांच्या विधानाचा तीव्र निषेध नोंदवला.