भडगाव: माजी नगराध्यक्ष राजेंद्र पाटील यांचा जाहीर नागरी सत्कार सोहळा नारायण मंगल कार्यालय येथे उत्साहात संपन्न,
समाजहितासाठी आपले व्यक्तिगत स्वार्थ बाजूला ठेवून प्रामाणिकपणे कार्य करणाऱ्या व नागरिकांसाठी नेहमी तत्पर राहणाऱ्या नगरपरिषद व पंचायत समितीतील माजी पदाधिकारी राजेंद्र जिभाऊ पाटील यांचा आज दिनांक 14 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी बारा वाजता भडगाव शहरातील नारायण मंगल कार्यालय येथे भव्य नागरी सत्कार करण्यात आला. या सोहळ्याला सर्वपक्षीय नेते, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले.