होऊ घातलेल्या परभणी महापालिका निवडणुकीसंदर्भात दोन दिवसांपूर्वी झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत महापालिकेवर राष्ट्रवादी अजित पवार गटाचा एक हाती झेंडा फडकविण्याचा एकमताने निर्णय घेण्यात आला. पक्षाच्या या बैठकीत न मागवता जवळपास ६५ इच्छुकांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. पक्षाच्या आदेशाने युतीत लढू नाहीतर राष्ट्रवादी अजित पवार गट स्वबळावर निवडणूक लढणार असल्याची माहिती शहराध्यक्ष प्रताप देशमुख यांनी माळी गल्ली येथे पत्रकार परिषदेत आज बुधवार 17 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजता दिली.