खंडाळा: लोणंद-फलटण रस्त्यावर तरडगाव येथे अज्ञात वाहनाने ठोकरल्याने वृद्धाचा मृत्यू; लोणंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
फलटण-लोणंद दरम्यान पालखी मार्गावर तरडगाव नजीक चाळशीमळा (ता. फलटण) येथे झालेल्या भीषण अपघातात एका वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी लोणंद पोलीस ठाण्यात अज्ञात चारचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोणंद पोलीस ठाण्यातून सोमवारी सकाळी साडे दहा वाजता मिळालेल्या माहितीप्रमाणे, हर्षद हेमंत गायकवाड वय 29, रा. बालाजीनगर, पुणे, मुळ रा. तरडगाव, ता. फलटण यांनी फिर्याद दिली आहे. रविवार दि. 19 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी सुमारे 5 वाजता अपघात झाला.